आठवी पास मंत्री उच्चशिक्षितांची पगार ठरवतात? – डॉ. प्रा. यशपाल भिंगे

गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुक्रमाबाद येथील परिसरातील धनगर समाजातील (Dhangar Samaj) विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नेत्रदीप यश संपादन केले आहे. अशा विद्यार्थ्यांचा दि (२४ऑक्टो) मंगळवार रोजी श्री क्षेत्र मष्णेर देवस्थानच्या पावनभूमीत दसरा सणाच्या (Dasara) निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती मुक्रमाबाद परिसराच्या वतीने या विद्यार्थ्यांचा प्रख्यात व्याख्याते, लेखक, विचारवंत डॉ. प्रा. यशपाल भिंगे (Yashpal Bhinge) यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

यावेळी डॉ. यशपाल भिंगे म्हणाले समाज बांधवाकडून मिळणारी कौतुकाची थाप ही तुमच्या भावी आयुष्यात समाजाची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आपण ज्या क्षेत्रात सेवा करत आहात तेथे प्रामाणिकपणे लोकसेवा करून समाजाचे नाव मोठे कराल मुखेड तालुक्यात धनगर समाजाने गटातटाणे न राहता एकसंघ समाज निर्मितीसाठी त्यांनी कानमंत्र दिला. आजच्या परिस्थितीत आठवी पास असणारे मंत्रीपदावर आहेत. मात्र अनेक वर्ष विद्यार्थी नोकरीसाठी उच्च शिक्षण घेऊन कंत्राटी पद्धतीने सुशिक्षित उमेदवारांचे पगार अशिक्षित मंत्री ठरवत आहेत याची खंत वाटते. त्यामुळे अभ्यासू आणि प्रगल्भ व्यक्तींना लोकसभा आणि विधानसभेमध्ये पाठवावं असं आवाहन उपस्थित युवकांना डॉ. यशपाल भिंगे यांनी केले. याप्रसंगी सत्कारमूर्ती मंजुषा लक्ष्मण कोळेकर हिची सहाय्यक अभियंता पदी विद्युत निर्मिती केंद्र कोराडी नागपूर येथे निवड झाली. एन टी सी महिला प्रवर्गातून राज्यातून प्रथम येण्याचा मान तिने मिळवला. तर डॉ. ज्ञानेश्वर बापूराव लोंगणे डॉ. सुनील देविदास लोंमणे या दोघांची पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाली. अभिषेक व्यंकटराव नाईक यांनी एमबीबीएस एमडी साठी पात्र झाले. डॉ.अभिषेक व्यंकटराव पाटील बीएएमएस पदवी पूर्ण झाली, मष्णाजी वामनराव कोकणारे वनरक्षक पदी निवड, माधव गोविंद करगणे मुंबई पोलीस, योगेश गोविंदराव नाईक एमबीबीएस एमडी, संगमेश्वर मल्लिकार्जुन दिंडे मुंबई पोलीस, अशा विविध क्षेत्रात नोकरी मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

यावेळी माजी सभापती अशोक पाटील रावीकर, माधवराव पाटील बामणीकर, सहायक पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, बाबुराव नाईक, विठ्ठलराव नाईक, बालाजी पाटील पुंजरवाडीकर, भाजपा शहर प्रमुख बालाजी रुपनर तग्याळकर, रामराव कारभारी नागराळकर, श्रीराम पाटील हळणीकर, पत्रकार लक्ष्मण कोळेकर, सरपंच जयराम बाचे पाटील, चंदू नाईक सावळीकर, राहुल शिगरे, शिवाजीराव गोपनर, ज्ञानोबा देवकते, सुधाकर खांडेकर, पुजारी सर बेनाळ, भास्कर तळणे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मष्णाजी बाजगिरे, राहुल इंदोरे, ज्ञानेश्वर राजुरे, सुधाकर सादगिरे, ज्ञानेश्वर पांढरे, विठ्ठल दिंडे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राजुरे यांनी केले. तर आभार प्रकाश काळे यांनी मानले, यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल