26व्या मजल्यावरून पडला महिलेचा आयफोन, पण पुढे जो प्रकार घडला त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही

 Apple iPhones हे प्रीमियम फोन मानले जातात. कंपनी त्यात कामगिरीसह डिझाइनचीही काळजी घेते. मात्र, किंमतीमुळे अनेकजण आयफोनला ट्रोलही करतात. पण, आता एक नवीन अहवाल त्याच्या ताकदीबद्दल देखील सांगतो. फोन जराही उंचीवरून पडला तर खूप त्रास होतो. पण, आताच समोर आलेल्या एका वृत्तानुसार २६ व्या मजल्यावरून पडूनही एका महिलेचा आयफोन कार्यरत राहिला.

एका चिनी महिलेने दावा केला आहे की तिचा Apple iPhone 12 Pro २६ व्या मजल्यावरून खाली पडला आहे. पण, तरीही तो  खराब झाला नाही. गिझमोचिनाने वृत्त दिले आहे की ती महिला अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या 26 व्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये रजाई टाकत होती जेव्हा तिचा स्मार्टफोन तिच्या खिशातून खाली पडला. पं तरीही फोनच्या स्क्रीनला कोणतेही नुकसान झाले नाही.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, iPhone 12 Pro मध्ये नुकसान टाळण्यासाठी काही प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात सुपर-सिरेमिक पॅनेल आणि मॅट टेक्सचर ग्लास बॅक पॅनल आहे. यात स्टेनलेस-स्टील फ्रेम देखील आहे, ज्याची गुणवत्ता चांगली आहे. आयफोन इतक्या कठीण परिस्थितीतून वाचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यामध्ये अनेक वर्षे समुद्राच्या पाण्यात राहूनही महिलेचा आयफोन काम करत होता.