दारूच्या नशेत दारुड्या पतीने पत्नीसोबत केला भयंकर प्रकार; पुण्यात खळबळ

पुणे : दारूमुळे अनेक संसार उध्वस्त झालेले आपण पाहिले आहेत. अनेकदा पती दारू पिऊन आल्यानंतर घरातला वाद टोकापर्यंत गेले आपण पाहतो, दरम्यान आता पुण्यातल्या वारजे मध्ये एका नराधमाने पतीने दारूच्या नशेत आपल्या बायकोला चाकू भोसकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मुलांने वस्तीत आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिक लोक मदतीला धावत आल्याने तात्काळ जवळचा हॉस्पिटलमध्ये भरती केल्या मुळे तिचा जीव वाचला आहे.(Pune Crime )

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात बेवडा पती हेमंत मधुकर सोनवणे (वय ३७ रा. विठ्ठल नगर वारजे ) याला वारजे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत मधुकर सोनवणे आरोपी पती हा पेशाने ड्रायव्हर आहे. त्याला रोजच दारू पिण्याची सवय आहे. त्याच्या लग्नाला अंदाजे 8 ते 10 वर्ष पूर्ण झाली असून त्याला दोन मुलं सुद्धा आहेत. ड्राइवर असल्याने रोज दारू पिण्याची सवय असल्याने बेवड्या पतीने घरात अनेकदा वाद घातलेत. अनेकदा टोकाची भांडण देखील झालेत.

मात्र गुरुवारी बेवड्या पतीने नेहेमीपेक्षा अधिक मद्यप्राशन केल्यामुळे पत्नीने जाब विचारला, याचा राग मनात धरून बेवडा पती जोर जोरात शिव्या देऊ लागला. मात्र वाद टोकाला गेल्यानंतर पतीने थेट किचन वरचा चाकू घेऊन पत्नीच्या पोटात भोसवकवला..! या प्रकरणात घाबरलेल्या लहान मुलाने चाळीत आरडा ओरडा केला मुळे स्थानिकांनी जखमी पत्नीला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं म्हणून जीव वाचण्यात डॉक्टरांना यश आल आहे.