रणबीर कपूरनंतर हुमा कुरेशी आणि कपिल शर्मासह ‘हे’ स्टार्स आता ईडीच्या रडारवर, पाठवले समन्स

ED Summon Huma Qureshi: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनंतर (Ranbir Kapoor) आता हुमा कुरेशीसह अनेक स्टार महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ED (Enforcement Directorate) च्या रडारवर आले आहेत. ईडीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी, टीव्ही अभिनेत्री हिना खान (hina khan) आणि प्रसिद्ध टीव्ही कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांना समन्स बजावले आहे.

अलीकडेच, ईडीने रणबीरला बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी समन्स पाठवले होते आणि त्याला 6 ऑक्टोबर रोजी रायपूर, छत्तीसगड येथील एजन्सीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ताज्या बातम्यांनुसार, रणबीरने ईडीला मेल करून 2 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. यामागे अभिनेत्याने वैयक्तिक कौटुंबिक कारणे आणि पूर्वीच्या वचनबद्धतेचा हवाला दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात केवळ रणबीर कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कपिल शर्माच नाही तर टीव्ही आणि बॉलिवूड जगतातील इतर सेलिब्रिटींचीही नावे आहेत.

रिपोर्ट्सनुसार, सनी लिओन, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, बॉलीवूड गायिका नेहा कक्कर, संगीतकार विशाल ददलानी (Sunny Leone, Pakistani Singer Atif Aslam, Rahat Fateh Ali Khan, Bollywood Singer Neha Kakkar, Musician Vishal Dadlani) यांचीही नावे या यादीत आहेत. मात्र, सध्या या सेलिब्रिटींची नावे अधिकृतपणे समोर आलेली नाहीत.

ऑनलाइन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नात सहभागी झालेल्या या सर्व सेलिब्रिटींना ईडी समन्स बजावत आहे. सौरभवर हवालाद्वारे स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या लग्नावर 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. लग्नात अनेक स्टार्सनीही परफॉर्म केले.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole