आमदार फुटले की पाठवले ? महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार (Thackeray Gov) संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. ठाकरेंची शिवसेनाच पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे आता शिवसेनेच्या धनुष्यबाण (Dhanshy Ban) या चिन्हावरच ते दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर शिवसेनेनं (Shivsena) संपूर्ण अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. शिवसेनेच्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा (Varsha) निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे गटात जाताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे मोठे नेते आहे पण त्यांच्या मागे शिवसेनेचे इतके मोठे इतके आमदार मागे जाताहेत, याविषयी शंका उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी असू शकते पण इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडतील याविषयी शंका वाटतेय.या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे असं वृत्त आहे.