विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं संजय राऊत यांना भोवणार? हक्कभंग कारवाईबाबत आली ‘ही’ मोठी अपडेट

Mumbai – विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde( म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ… विधीमंडळ नाही ‘चोर’मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. असं ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. तसेच, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे.