शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता; महाजनांच्या सूचक वक्तव्याने खळबळ

Mumbai – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे (NCP)अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने आलं होतं. माझ्या संपर्कातील लोकांना असं वाटतं की तिकडे राहून काही उपायोग नाही. असं महाजन म्हणाले.

माझ्या संपर्कात काँग्रेस , राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आहेत. काँग्रेसमध्ये तर मोठं अलबेल सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वही कोणाला विचारत नाही? खाली काय सुरू आहे याकडे त्यांचं लक्ष नसतं. काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे कोणाला विचारतात? कोणाला वेळ देतात? त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्व अलबेल सुरू आहे. अनेकांना वाटतं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, जिथे आपल्याला राजकीय न्याय मिळेल , असा दावा महाजनांनी केला आहे.