‘भाजपने आपले बिअर व वाईनरीचे कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकावे’

मुंबई : तुम्हाला विरोधच करायचा असेल तर भाजप नेत्यांनी आपल्या व कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅकबंद केलेले पाणी विकण्यास सांगा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला दिला आहे.

सरकारने मॉल व सुपरमार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटच्या माध्यमातून विरोध कसा कराल असा सल्ला दिला आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील तुमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅक बंद पाणी विकण्याचा थेट सल्ला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करुन दिला आहे.