सातत्याने जिंकणारे कधीतरी हरले तर त्याचीच चर्चा जास्त होते; कसब्याच्या निकालावर फडणवीसांचे भाष्य   

Pune Election : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) विजयी गुलाल उधळला.   गेल्या 28 वर्षांपासून भाजपचा (BJP) गड मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी जिंकले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.

दरम्यान, या निवडणूक निकालावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. सातत्याने जिंकणारे कधीतरी हरले तर त्याचीच चर्चा जास्त होते.महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही जागा आमच्याच येतील असं अपेक्षित होतं. मात्र कसबा पेठेत अतिशय चांगली मतं घेऊनही आम्ही विजयी झालो नाही. ४५ टक्के मतं आम्हाला मिळाली आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.