फडणवीस किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे भाजप (bjp) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप निलेश rane यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात.

दरम्यान, खासदार शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम सोबत जोडल्याने निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवार दाऊदचा पहिला माणूस असल्याचा मला संशय आहे. महाराष्ट्रात संशय देखील घेऊ शकत नाही का, अटक होण्याआधी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला. मग नवाब मलिक जेलमध्ये आहेत, त्यांचा राजीनामा का नाही. मलिक पवारांचे कोण लागतात, असा सवाल त्यांनी केला. कितीही गुन्हे दाखल करा. मात्र, मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.