Gautam Gambhirने सोडली लखनऊची टीम, दोन वेळच्या विजेत्या संघाचा बनला मार्गदर्शक

Gautam Gambhir left LSG: आयपीएलच्या मागील दोन हंगामांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाला आयपीएल 2024 पूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आधीच संघ सोडला होता. आता मार्गदर्शक गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वतः गंभीरने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा नवा मार्गदर्शक (KKR New Mentor Gautam Gambhir) बनला आहे. केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत, तर कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

फ्लॉवर प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यापासून गंभीरही लखनौ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. केएल राहुलसोबतचा त्याचा कार्यकाळ शानदार राहिला असून, त्याचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, दोन्ही वेळा तो प्लेऑफमधून बाहेर पडला आणि अंतिम फेरी गाठू शकला नाही.

गंभीरने त्याच्या पोस्टमध्ये काय लिहिले?
गंभीरने बुधवारी आपल्या पोस्टमध्ये लिहिले – एलएसजी ब्रिगेड! यासोबत त्याने दोन हार्ट इमोजी जोडले. गंभीरने लिहिले- लखनऊ सुपर जायंट्ससोबतचा माझा अप्रतिम प्रवास संपल्याची घोषणा करत आहे. या क्षणी, मी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि ज्यांनी हा प्रवास संस्मरणीय बनवला आहे त्या सर्वांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. डॉ. संजीव गोयंका यांनी एक उत्तम फ्रँचायझी तयार करण्यात उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मला खात्री आहे की हा संघ भविष्यात उत्तम कामगिरी दाखवेल आणि लखनौच्या सर्व चाहत्यांना अभिमान वाटेल. एलएसजी ब्रिगेडला खूप खूप शुभेच्छा.

केकेआरमध्ये परतल्यावर गंभीर काय म्हणाला?
गंभीरने यापूर्वी केकेआरसोबतही काम केले आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. गंभीर 2011 ते 2017 पर्यंत KKR चा कर्णधार होता आणि आता तो या संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करेल. आपल्या जुन्या फ्रँचायझीमध्ये परतल्यावर गंभीर म्हणाला- मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, पण ही गोष्ट वेगळी आहे. मी परत आलो आहे जिथे हे सर्व सुरू झाले. आता जेव्हा मी पुन्हा एकदा जांभळ्या आणि सोन्याची जर्सी घालण्याचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात आग होते. मी केवळ केकेआरमध्येच परतत नाही तर सिटी ऑफ जॉयमध्ये परत येत आहे. मी परत आलो आहे. मला ट्रॉफीची भूकआहे. मी 23 जर्सी क्रमांकाचा खेळाडू आहे. अमी केकेआर.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा