भीम जयंती : ‘आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते, पण तरीही… ‘

सांगली – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Bhim jayanti ) यांची 131 वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. अर्थशास्त्रज्ञ, मानवाधिकार आणि महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते असणारे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीचे राष्ट्रनिर्माते मानले जातात. त्यांनी समसरसता वाढवण्यासाठी योगदान दिले आणि जातिव्यवस्थेतील वाईट चालीरीती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच गरीब आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी सातत्यानं काम केलं

दरम्यान,आज देशभरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने आंबेडकर जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी आपल्या भावना व्यक्त करत महामानवाला अभिवादन केले आहे. ते म्हणाले, आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचिताना प्रेरणा देणारा आहे. कारण आज परमपुज्य विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb ambedkar ) यांची आज जयंती आहे.

डॉ.बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजवीज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. जेंव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात. आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर अॅट्रोसिटीच्या घटनाही वाढायला लागतात. आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल.असं पडळकर यांनी म्हटले आहे.