‘आरक्षणाला समर्थन देताना कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून…’, Kiran Maneचा मराठा समाजाला खास सल्ला

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु होतं. सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली असून त्यांनी आता आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्यावतीने निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनिल सुक्रे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. न्यायमूर्ती आणि राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं म्हटलं. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी २ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत दिली आहे.

असे असले तरीही, मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला वादविवाद अजूनही संपलेला नाही. दरम्यान आता मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मराठा बाधवांना खास सल्ला दिला आहे.

किरण माने (Kiran Mane Advice To Maratha Samaj) आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, “मराठा बांधवांनो…आपल्या महामानवांनी कधीही दुसर्‍या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छत्रपती शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं.

शाहूराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही.” सध्या किरण मानेंची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत तर अनेकांनी त्यांच्या मताचे समर्थनही केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानचा खेळ बिघडला, सेमी फायनलची शर्यत बनली आणखी मनोरंजक

Video: Urfi Javed ला मुंबई पोलिसांकडून अटक? तोकडे कपडे घातल्याने रस्त्यावरुनच उचललं

दिवाळीला सोने विकत घेताना ‘या’ गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!