शरद मोहोळला संपवण्यासाठी ‘तो’ सात दिवसांपूर्वी गँगमध्ये आला, संधी साधत केला गेम

Gangster Sharad Mohol murder – कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Killed) याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे. सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला. त्यानेच त्याचा संधी साधत गेम केला.

शरद मोहोळ दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपी त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत असताना मुन्ना पोळेकर याने चार गोळ्या मारल्या होत्या. यामधील एक पायाला आणि दोन पाठीला लागल्या. जेव्हा शरद मोहोळ हल्ला कोणी केला हे पाहायला मागे फिरला त्यावेळी त्याच्या छातीत चौथी गोळी मारली. गोळ्यांच्या आवाजाने बाजूचे सर्वजण बाहेर आले तेव्हा शरद मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता आणि आरोपी पसार झाले होते.

गुन्ह्याचा तपास करताना पुणे शहर गुन्हे शाखेची तपास पथके पुणे शहर परिसर, पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

शरद मोहोळ याची हत्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातुन केली असल्याचं प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झालं आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात