Sharad Mohol | जाणून घ्या पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचं भाजपाशी काय होत कनेक्शन

Gangster Sharad Mohol murder – कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे. सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला. त्यानेच त्याचा संधी साधत गेम केला.

शरद मोहोळ दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपी त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत असताना मुन्ना पोळेकर याने चार गोळ्या मारल्या होत्या. यामधील एक पायाला आणि दोन पाठीला लागल्या. जेव्हा शरद मोहोळ हल्ला कोणी केला हे पाहायला मागे फिरला त्यावेळी त्याच्या छातीत चौथी गोळी मारली. गोळ्यांच्या आवाजाने बाजूचे सर्वजण बाहेर आले तेव्हा शरद मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता आणि आरोपी पसार झाले होते.

दरम्यान, या प्रकरणाच्या निमित्ताने मोहोळ याचे भाजप सोबतचे कनेक्शन देखील चर्चेत आहे. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी पक्षप्रवेश केला तेव्हा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स