Mahadev Jankar | महाराष्ट्रात रासपला घाबरणारे देशात चारशे जागा घेणार; विश्वंभर चौधरी यांची भाजपावर सडकून टीका

Mahadev Jankar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आपली भूमिका बदलली आहे. महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी महादेव जानकर यांना लोकसभेसाठी एक जागा देण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला. यावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

महादेव जानकर (Mahadev Jankar) बारामतीला गेले की लगेच दुसर्‍या दिवशी बोलावून एक जागा देऊन टाकली! एकेका जागेसाठी मरमर करत आहेत आणि म्हणे चार सौ पार! महाराष्ट्रात रासपला घाबरणारे देशात चारशे जागा घेणार आहेत. आतून पूर्णतः घाबरलेले आहेत. उसनं अवसान आणून चार सौ पार वगैरे चाललंय. भक्तुल्यांना चघळायला विषय दिला आहे, अशा तिखट शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच हुकूमशाही हरणार, लोकशाही जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार