Mahadev Jankar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट जानकरांसाठी निरोप; म्हणाले, जानकरांना सांगा मी…

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर जानकरांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी सभेत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी आणि परभणीच्या जनतेसाठी महत्त्वाचा संदेश पाठवला असल्याचेही सांगितले.

फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चालू आहे का? आम्ही त्यांना सांगितलं हो चांगलं चालू आहे. आता तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत. महादेव जानकर यांचा अर्ज भरण्याकरता जात आहोत. तेव्हा मोदी म्हणाले, जानकरांना (Mahadev Jankar) सांगा की, अठराव्या लोकसभेसाठी मी त्यांची वाट पाहत आहे. तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. माझ्याकडून परभमीच्या नागरिकांना बोला की, तुमच्यासाठी जानकारांना पाठवलं आहे. त्यांना सकुशल दिल्लीला पाठवा. मोदींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका