Manoj Jarange | मनोज जरांगेंनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवावी, आमचा त्यांना पाठिंबा राहील; पहा कुणी केली घोषणा ?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सध्या चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांसमोर ठेवला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange)  आमच्याजवळ उशी कुठलीही मागणी केलेली नाही. हा वंचितचा पुढाकार आहे. मविआने मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कँडिडेट म्हणून जाहीर करावं, अशी आमची इच्छा आहे असे वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी लातूर लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) लढवावी. आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे विधान स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी गुरुवारी केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरती येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी. जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव