Modi Govt च्या मुत्सद्देगिरीचा विजय; कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या नौदलाच्या 7 माजी कर्मचाऱ्यांची सुटका

Modi Govt : कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy) 7 माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून ते आज मायदेशी परतले आहेत. दाहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या 8 जणांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. देशात परतलेल्या आठपैकी सात नौसैनिकांनी ‘भारत माता की जय’ म्हणत दिल्ली विमानतळावरून बाहेर पडले.

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कतारचे अमीर यांचे या सुटकेसाठी आभार मानले आहेत. यापुर्वी नवी दिल्लीच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर त्यांची फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलण्यात आली होती. ते ऑक्टोबर 2022 पासून कतारमध्ये तुरुंगात होते.सुटका झालेल्या भारतीयांनी केंद्र सरकारचे (Modi Govt) आभार मानले आहेत.

“आम्ही भारतात सुरक्षितपणे परतलो याचा आम्हाला खूप आनंद आहे. निश्चितपणे, आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो, कारण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळेच शक्य झाले”, असे त्यांच्यापैकी एकाने सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी

You May Also Like