PFI आंदोलनावेळी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ?

पुणे : पुण्यासह राज्यभरात एनआयएनएने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने ( Popular Front of India Protests in Pune ) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे.

यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ( Pakistan Zindabad ) करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे ( Pakistan Zindabad slogans in Pune ) देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.