Sunetra Pawar | “वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद

Sunetra Pawar | महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल भोर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी भोर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भोर तालुक्यातील चिखलावडे बुद्रुक गावातील शेतकरी महिला व पुरुषांनी त्यांना वन्य प्राण्यांकडून होणारा त्रास कळवळून सांगितला. मोठ्या कष्टाने, घाम गाळून शेतात रुजवलेले, जोपासलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते करण्याचे काम होत आहे. याबाबत वन्य विभाग आणि अन्य पातळीवर उपाययोजना करन्यासाठी नक्की प्रयत्न करेन, अशी सुनेत्रा पवार यांनी नागरीकांना ग्वाही दिली. त्याचबरोबर यावेळी या परिसरात राष्ट्रवादीच्या, महायुतीच्या माध्यमातून झालेल्या, होत असलेल्या विकासकामांची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

यातच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी भोर तालुक्यातील चिखलावडे खुर्द गावाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी औक्षण करत म्हणाले की, तुम्हीच खासदार होणार बघा. तर नांटबी गावात गेल्या असता गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात स्वागत केले. मात्र नाझरे गावात सुनेत्रा पवार यांना वेगळाच अनुभव आला.  त्याठिकाणी काही महिलांशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या की, खास तुम्हाला भेटायला सगळी काम सोडून आम्ही साऱ्याजणी आलो आहे. पेपरात, टिव्हीत तुम्हाला पाहताना तुम्ही आम्हाला आमच्याच वाटता. असेही त्यांनी म्हटले. तसेच या ठिकाणी झालेल्या भाषणांमध्ये स्थानिकांनी, झालेला विकास हा महायुतीच्या माध्यमातूनच झाला असल्याचे सांगून हे गाव घड्याळालाच मताधिक्य देईल अशी ग्वाही त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी  दिली.

त्यानंतर शंभूतीर्थ, पान्हवळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या ठिकाणी विशेषतः महिला भगिनींचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पवार यांना विशेष भावला. स्थानिकांसह विविध पदाधिकारी मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित माता-भगिनींपैकी एक चंद्रभागा कोंढाळकर यांनी तर स्वतःहून पुढे येऊन माइक हाती घेतला. आणि जोशात बोलल्या, “तुम्ही माझ्या लेकी सारख्या आहात. पण तुम्हाला सगळेच वहिनी म्हणतात म्हणून मीही म्हणते. वहिनी, आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचा विजय घोषित झालेला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके