डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर अतिरिक्त जी एस टी लावण्याचा प्रस्ताव? नितीन गडकरी म्हणाले,…

Nitin Gadkari – डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर अतिरिक्त 10 टक्के वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

काही प्रसार माध्यमांनी डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर अतिरिक्त 10 टक्के जी एस टी लागू होणार असल्याचं वृत्त दिलं होतं, त्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवरील एका संदेशात गडकरी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

2070 पर्यंत देशात शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठण्यासाठी तसंच डीझेलसारख्या इंधनामुळे होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि हरित इंधन स्वीकारणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी पुढे म्हंटलं आहे.

https://youtube.com/shorts/Tn13poRRNl4?si=Fnp7msXQ_47fDZ0H

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून