PSL 2024 | धक्कादायक! पाकिस्तानी लीगच्या फायनलदरम्यान धूम्रपान करताना दिसला पाकिस्तानी क्रिकेटर

इस्लामाबाद युनायटेडने (Islamabad United) सोमवारी खेळल्या गेलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2024) च्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील मुलतान संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात शादाब खानच्या नेतृत्वाखालील इस्लामाबादने शेवटच्या चेंडूवर आठ गडी गमावून 20व्या षटकातच लक्ष्य गाठले. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात इस्लामाबादच्या इमाद वसीमने पाच विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. मात्र, या पाच विकेट्सपेक्षा तो इतर कारणांमुळे अधिक चर्चेत आहे.

खरं तर, मुलतानचा डाव संपल्यानंतर जेव्हा इस्लामाबादची फलंदाजीची पाळी होती, तेव्हा इमाद ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला. जेव्हा तो धूम्रपान करताना दिसला तेव्हा कॅमेरा त्याच्याकडे होता. नंतर तो स्वतःच हसायला लागला. हे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धुम्रपान केल्यानंतर इमाद फलंदाजीला आला आणि नाबाद राहिला आणि संघाला विजयापर्यंत नेले.

इस्लामाबादच्या विजयानंतर (PSL 2024) इमाद बॅटला मांडीवर घेऊन आणि मैदानावर सिगारेट ओढून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसला. तो कर्णधार शादाब खान आणि इतर खेळाडूंना काहीतरी सांगताना दिसला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका