मराठ्यांच्या शेवटच्या युद्धावर आधारीत ‘इ.स.१८१८ मराठ्यांचे शेवटचे युद्ध’ पुस्तकाचे प्रकाशन

लेखक प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील (Prasad Chandrakant Dangat Patil) यांच्या इ. स. १८१८ मराठ्यांचे शेवटचे युद्ध, या मराठयांच्या शेवटच्या युद्धावर आधारीत किल्ल्यांच्या लढ्यावरील पुस्तकाचे प्रकाशन वीर बाजी पासलकर स्मारक येथे पार पडला.

मराठ्यांनी आपले शेवटचे युद्ध ब्रिटिशांविरुद्ध लढले, हिंदुस्तानात बलाढ्य असलेल्या मराठा सत्तेच्या आपापसातील कलहामुळे ब्रिटिश कवायती सैन्यासमोर हार पत्करावी लागली. याच काळात मराठा सत्तेचा कणा असलेले गड- कोट ब्रिटिशांनी युद्ध करून घेतले,  पण हे युद्ध नक्की कसे झाले, त्या मागील पार्श्वभूमी आणि त्याचे मूळ कागदपत्रांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.

खासा औरंगजेब बादशहा स्वतः स्वराज्यावर चाल करून आला तरी त्याला हे गड-कोट घेणे शक्य झाले नाही, जे मूठभर ब्रिटिशांनी अवघ्या दोन वर्षात कसे शक्य केले, याचे कुतूहल सर्व शिवपाईकांना आहे;  त्यामुळेच इ. स. १८१७ – १८१८ या दोन वर्षातील किल्ल्यांची युद्ध परिस्थिती दर्शविणारे समकालीन नकाशे, महत्त्वाचा पत्र व्यवहार, लूट, युद्ध सामग्री यांचा आढावा ब्रिटिश दस्तऐवजामधून अभ्यासून विस्तृतपणे या पुस्तकात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तसेच संबंधित युद्धाचे नकाशे व चित्रे पुस्तकात देण्यात आले आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे, कुतूहलतेने गड-कोट भ्रमंती करणारे आणि जिज्ञासू वाचक यांच्यादृष्टीने हे पुस्तक म्हणजे मोलाचा ऐवज आहे, यात शंका नाही!

सदर कार्यक्रमाला इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर तसेच मोडी अभ्यासक ब. ही. चिंचवडे, गिरीष खत्री, विकास नाना दांगट पाटील, प्रमोद मोर्ती, राहुल गोरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात वीर पत्नी साधना दिलिप ओझरकर (Sadhana Dilip Ozarkar) यांना राष्ट्रप्रथम परिवारा तर्फे दुर्ग महर्षी प्रमोद मांडे (Pramod Mande)राष्ट्रप्रथम पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा