Rajya Sabha Election 2024 | भाजप राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत; विरोधक धास्तावले

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या देशभरातील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमधे राज्यातल्या प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), नारायण राणे (Narayan Rane), व्ही मुरलीधरन (V Muralidharan), वंदना चव्हाण (Vandana Chavan), अनिल देसाई (Anil Desai), कुमार केतकर (Kumar Ketkar), या सहा सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत.

या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक पार पडली. महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व 6 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यासाठी या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्यावर्षी राज्यसभा निवडणुकीत जो पराक्रम भाजपने करुन दाखवला अगदी तसाच पराक्रम भाजप करुन दाखवण्याचा तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विरोधक देखील धास्तावले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान