गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाविषयी पहिल्यांदाच बोलले शरद पवार, म्हणाले…

Sharad Pawar On Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील ही काही दिवसांपूर्वी तिच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील कार्यक्रमामुळे अडचणीत सापडली होती. वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

आता  मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भाषणात या प्रकरणाचा उल्लेख केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले, सरकार खासगी कंपन्यांना जिल्हा परिषद शाळा चालवायला देणार आहेत. सीएसआर फंडातून या शाळा चालवण्यास परवानगी देणार आहेत. यातून विकास करावा. ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली, त्या शाळेला कोणतंही नाव घेण्याचा नाव देण्याचा अधिकार आहे. शाळेच्या कारभारात दखल देण्याचा, शाळेची संपत्ती खासगी कार्यक्रमासाठी देण्याचा अधिकार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका मद्य बनवणाऱ्या कंपनीने एक शाळा दत्तक घेतली. तेथे त्यांनी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?