Shirur LokSabha 2024 | ‘तुतारीचा आवाज ऐका, पण घड्याळाशिवाय काही चालत नाही’

शिरूर | शिरूर लोकसभा निवडणूक (Shirur LokSabha 2024) हि संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. एका बाजूला या ठिकाणी  महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) गटातील माजी खासदार शिवारीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) मैदानात आहेत. तर दुसऱ्या बाजूला खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलीय. दोन्ही उमेदवारांनी आता आपला प्रचार जोरदारपणे सुरू केलाय. यातच शिरूर तालुक्यातील वडनेर गावात बैडगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी घाटात शरद पवार गटाचे आणि अजित पवार गटाचे समर्थक आमनेसामने आल्याचे बघायला मिळाले.

बैलगाडा शर्यत सुरू असतानाच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यानंतर आयोजकांना बैलगाडा शर्यत थांबावावी लागली. त्यानंतर उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी आपलं भाषण सुरू केलं. त्यावेळी अजित पवार गटाचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी बैलगाडा शर्यतीवेळी दरम्यान भाषण करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी घाटातल्या मंडळींनी तुतारी वाजवण्याचा आग्रह धरला. तेव्हा  पोपटराव गावडे यांनी तुतारीचा आवाज ऐका, पण घड्याळाशिवाय काही चालत नाही. असा डॉयलाग मारला. त्यावेळी घाटात एकाच हश्शा  पिकला.  यातच आयोजकांनी मात्र गावची यात्रा आहे, राजकारणाचा (Shirur LokSabha 2024) विषय काढू नका अस म्हण वेळ मारून नेली. त्यामुळे याची राजकारणात एकच चर्चा सुरू झाली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल