Amol Kolhe | शेतकऱ्यांची सध्याची दयनीय अवस्था पाहता, पुन्हा महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा असूड उगारण्याची वेळ

Amol Kolhe | आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुल्यांनी केले आहे त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा असूड’ या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, फुल्यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा असूड’ हा  ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे.

सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन असले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके