संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाहीत – नितेश राणे

Mumbai – विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असं वक्तव्य केलं.

नितेश राणे म्हणाले, आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलेलं. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.