Vijay Antony Daughter : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेता विजय अँटोनीची १६ वर्षीय मुलगी मीरा (Meera Antony) हिने आत्महत्या केली आहे. निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मीरावर बुधवारी चेन्नई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या मृत्यूने विजयसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर विजयने आता त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लाडक्या लेकीसाठी अतिशय भावनिक नोट लिहिली आहे.
यात तो लिहितो की, ‘माझी लाडकी लेक मीरा.. सर्वात दयाळू आणि धाडसी होती. पंथ, जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, दारिद्र्य किंवा वाईट जग तिने सोडले आहे. ती आता शांततेने भरलेल्या ठिकाणी गेली आहे. असं मला वाटतं. ती अजूनही माझ्याशी बोलते आहे.
— vijayantony (@vijayantony) September 21, 2023
ती मेली तेव्हा तिच्यासोबत माझा देखील मृत्यू झाला आहे. आता मी तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. मी काही तिच्या नावाने काही चांगले काम सुरू करणार आहे. मला विश्वास आहे की हे सर्व त्याच्याकडूनच सुरू होईल.’
https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f
महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती