Sanjay Mandalik | आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

Sanjay Mandalik | आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रफती शाहू महाराजांविषयी हे वादग्रस्त विधान केले आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. यादरम्यान प्रचारावेळी संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.

मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत.त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार, असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके