Jayant Patil | महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी ? जयंत पाटील यांचा सवाल

Jayant Patil- महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले, मुळात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते, हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मुळात देशभरात सात टप्प्यात व महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान घेण्याची गरज नाही, चार ते पाच टप्प्यात हे मतदान प्रक्रिया पार पडली असती. विशेषत महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ त्यासाठी ५ टप्पे मतदानासाठी काहीच गरज नव्हती. यातून कोणाची सोय करायची आहे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, ऑल इंडिया पँथर सेना ही अनेक राज्यात काम करत असते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे आज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. आज त्यांनी शरद पवार साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे त्याच मनपूर्वक अभिनंदन करतो असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आमचा प्लान बी नाही आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे. आमचा प्लान एकच आहे. प्रकाश आंबेडकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील एकच प्लान आमच्या करिता ठेवावा असे जयंत पाटील बोलताना सांगितले आहे.

जयंत पाटील यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, महायुती मधील दोन मित्र पक्ष यांना बाजूला ठेवून भाजपने आधीच जागा वाटप करत यादी जाहीर केली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पळतो. सर्वांचे वाटप झाल्यावर आम्ही करतो. बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी सोबत येतील. ते सोबत तोडगा काढतील. संविधान वाचवण्यासाठी सोबत येणं गरजेचं आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे. आज ज्योती मेटे यांच्यासोबत यावर आम्ही सल्लामसलत केलं आहे. अंतिम निर्णय जाहीर करू. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रपक्ष बोलत आहेत. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत असेही जयंत पाटील बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?