भूकंपग्रस्तांच्या आरक्षणासाठी राज्य सरकारकडे ताकतीने लढू- MP Supriya Sule

Supriya Sule – लातूर येथील किल्लारी (Killari Earthquake) परिसरात झालेल्या भूकंपाला तीस वर्षे पूर्ण आहे. भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत किल्लारीत आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भूकंपग्रस्तांच्या आरक्षणासाठी (Earthquake Victims Reservation) राज्य सरकारकडे ताकतीने लढू असा शब्द भूकंपग्रस्तांना दिला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या आयुष्यात तीन-चार घटना महत्त्वाच्या आहेत. त्यातील मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता असते. सलग दोन आठवडे ते किल्लारी परिसरात राहिले होते. त्यावेळी दोन आठवडे सतत भूकंपाच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी मोबाईल व इतर संपर्काची कोणतीही साधने नव्हती. त्यामुळे कोण कोठे आहे, हे काहीच कळत नव्हते. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची आज आठवण येते. तसेच पद्मसिंह पाटील यांनाही आजच्या कृतज्ञता सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांना आज कार्यक्रमाला येता आले नाही त्यांनीही केलेल्या कामाची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. या सर्वांनी महाराष्ट्राच्या उभारणीत जे काम केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

भूकंपग्रस्त आरक्षणाच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर त्याबाबत सरकारशी आम्ही ताकदीने लढू. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेश टोपे, मी मिळून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे, त्यामुळे त्यांची ताकद काय असू शकते असे दिसून येते, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कांदा, तूर, सोयाबीन अशा पिकांना हमीभाव या सरकारकडून मिळत नाही. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सरकारशी भांडू. कांद्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा मी प्रश्न उचलला होता. दिल्ली सरकारकडे जे प्रश्न असतील त्यावर मी आणि ओमराजे निंबाळकर मिळून सरकारशी भांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?