ADR Report: कोणत्या पक्षाकडे किती मालमत्ता आहे? एडीआरने अहवाल प्रसिद्ध केला

ADR Report: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने आपला अहवाल सादर केला असून यातून बरीच महत्वाची माहिती समोर आली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात भाजपने 4,990 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती, जी 2021-22 मध्ये 21.17 टक्क्यांनी वाढून 6,046.81 कोटी रुपये झाली. ADR नुसार, 2020-21 मध्ये काँग्रेसची घोषित मालमत्ता 691.11 कोटी रुपये होती, जी 2021-22 मध्ये 16.58 टक्क्यांनी वाढून 805.68 कोटी रुपये झाली.

या अहवालात म्हटले आहे की, बसपा हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याने आपल्या वार्षिक घोषित मालमत्तेत घट दर्शविली आहे. 2020-21 आणि 2021-22 दरम्यान, BSP ची एकूण संपत्ती 5.74 टक्क्यांनी घटून 690.71 कोटी रुपये झाली, ती 732.79 कोटी रुपयांवरून कमी झाली आहे. एडीआरने म्हटले आहे की तृणमूल काँग्रेसची एकूण मालमत्ता 2020-21 मध्ये 182.001 कोटी रुपये होती, जी 151.70 टक्क्यांनी वाढून 458.10 कोटी रुपये झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –