Ranji Trophy 2024: कोण आहे साई किशोर? ज्याने सेमी फायनलमध्ये ५ विकेट्स घेत मुंबईचे कंबरडे मोडले

Ranji Trophy 2024 Who Is Sai Kishore: मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान साई किशोरचे नाव आता सर्वांच्या ओठावर आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात साई किशोरने अशी जबरदस्त गोलंदाजी केली, ज्यामुळे मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. फलंदाजीमध्ये तामिळनाडूची कामगिरी काही खास नसली तरी गोलंदाजीत साई किशोरने संघात पुनरागमन केले. मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साई किशोरने अप्रतिम गोलंदाजी केली. लंच ब्रेकपर्यंत साई किशोर मुंबईने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मुंबईचा निम्म्याहून अधिक संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.

कोण आहे साई किशोर?
साई किशोरचा जन्म 6 नोव्हेंबर 1996 रोजी चेन्नईच्या मदिपक्कम गावात झाला. साई किशोरचे पूर्ण नाव रवी श्रीनिवास साई किशोर आहे. साई किशोर लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता, यासोबतच त्याला क्रिकेटमध्येही खूप रस होता. साई किशोर याचे लहानपणी शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न होते पण क्रिकेटमधील आवड असल्याने त्याने क्रिकेटला आपले स्वप्न बनवले. सध्या, साई किशोर रणजी ट्रॉफी 2024 मध्ये तामिळनाडू संघाचे नेतृत्व करत आहे. साई हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. वयाच्या 10 व्या वर्षी साईने पहिल्यांदा क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच साई किशोरने अभियांत्रिकी महाविद्यालय सोडले आणि क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

2016 मध्ये पदार्पण केले
साई किशोरने 2016-17 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये साईची कामगिरी चमकदार आहे. साईने 2016 मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत साईने शानदार गोलंदाजी करत 12 बळी घेतले आणि स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला. 2018-19 रणजी ट्रॉफीमध्ये साईने आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. साईने या मोसमात 6 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही
साई किशोरने 2018-19 च्या हंगामातील लिलावात त्याचे नाव दिले होते परंतु या दोन्ही हंगामात त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. मात्र, आयपीएलमध्ये साई किशोरने चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जसारख्या संघांमध्ये नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सच्या चाचण्यांसाठी साई किशोरही गेला होता पण तिथेही त्याची निवड होऊ शकली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू