केतकीच्या पोस्टवरून युवक कॉंग्रेसने साधला भाजपवर निशाणा

नाशिक – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर (NCP Leader Sharad Pawar) आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत (Kalva Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. याबाबत नाशिक युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार (Nashik Yuva Congress Leader Manas Pagar) यांनी आझाद मराठीला लक्षणीय प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील उजव्या अतिरेकी विचार मांडणाऱ्या तरुण पिढीच्या मानसिक आरोग्याविषयी गंभीर प्रश्न तयार झाले आहे. ही वेळ सातत्यपूर्ण पद्धतीने विखारी द्वेषमूलक अमानवीय विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या अतिरेकी उजव्या विचारधारेच्या लोकांनी महाराष्ट्रासारख्या सुबुद्ध प्रदेशावर आणली आहे. जी प्रतिक्रिया या तरुण अभिनेत्रीने दिली ती चिथावणीपूर्ण सामाजिक द्वेषाला (hate) आणि हिंसाचाराला (violence) जन्म देणारी आहे.

माननीय शरद पवार हे देशातील जेष्ठ नेते असून त्यांची स्वतःची काही एक राजकीय (Political) व सामाजिक (Social) तपस्या आहे. अशा व्यक्तीबद्दल इतक्या अनर्गल पद्धतीने विखारी प्रतिक्रिया देऊन समाजात हिंसाचार निर्माण करण्याचा भाजपचा (BJP) कार्यपद्धतीचा अनिवार्य भाग म्हणून या अभिनेत्रीची प्रतिक्रिया आहे असे आम्ही मानतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) आमच्या सारखे लोकं या मुलीवर भारतीय दंड विधानाच्या उचित कलमाखाली कारवाई व्हावी या मताचे आहोत. तसा आम्ही राज्य शासनाकडे आग्रह धरतो. असं ते म्हणाले आहेत.