कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली; आज भाजपची महाबैठक 

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली असून या दोन्ही जागांवर कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना आता लागूून राहिली असताना आता भाजपने देखील आपली तयारी सुरु केली आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कसबा भाजपची महाबैठक आज आयोजित करण्यात आली आहे. आरसीएम गुजराती हायस्कूल, फडके हौद चौक या ठिकाणी आज सायंकाळी ही बैठक होणार आहे.