सोडा खरेदी करायला गेली आणि महिलेने जिंकले चक्क ८३ लाख, किस्सा ऐकून व्हाल चकित!

सोडा खरेदी करायला गेली आणि महिलेने जिंकले चक्क ८३ लाख, किस्सा ऐकून व्हाल चकित!

Women won 83 lakhs lottery: माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. आज गरिबीत जीवन जगणारी व्यक्ती उद्या सुद्धा असेच जीवन जगत असेलच असे नाही कारण एखाद्याचे आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो. अशा तुम्ही नशिबाशी संबंधित अनेक कथा ऐकल्या असतील. जिथे लोकांचे जीवन एका क्षणात बदलले. अशीच एक घटना सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नशिबाबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, नशीब कोणाला कधी चमकवेल हे सांगणं फार कठीण आहे कारण गरीबाला राजा आणि राजाला गरीब बनायला जास्त वेळ लागत नाही. असाच काहीसा प्रकार जेनेट बेन नावाच्या महिलेसोबत घडला. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या या महिलेचे नशीब चमकले जेव्हा ती दुकानातून सोडा खरेदी करायला गेली आणि तिथून निघताना तिला 100,000 डॉलर म्हणजेच 83 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. ही रक्कम महिलेला समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

एवढी मोठी लॉटरी कशी लागली?
रिपोर्टनुसार, जेनेट बेन दुसरीकडे कुठेतरी जात होत्या, यावेळी ती सोडा पिण्यासाठी एका जनरल स्टोअरमध्ये थांबली आणि तिथे उभी असताना तिने लॉटरीचे स्क्रॅच तिकीट विकत घेतले. बेन सांगतात की लॉटरीसाठी तिचं नाव येताच तिला धक्का बसला आणि रक्कम कळल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हा पैसा कसा खर्च करायचा हे सध्या ती ठरवत असल्याचं बेन सांगतात.

मात्र, अशी घटना पहिल्यांदाच समोर आली आहे असे नाही. ब्रिटनमध्ये एक महिला दूध आणि ब्रेड घेण्यासाठी गेली होती, जिथे तिला लॉटरीच्या तिकिटावर लाखोंचे बक्षीस मिळाले. अशीच एक घटना अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये पाहायला मिळाली, जिथे गॅरी लेसी नावाची एक महिला सिगारेट विकत घेण्यासाठी गेली आणि तिने 5 मिलियन डॉलर्सची लॉटरीही जिंकली.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki

Previous Post
Quick Breakfast Recipe: रवा इडलीची झटपट बनणारी रेसिपी, या फोडणीने ती आणखी स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवा

Quick Breakfast Recipe: रवा इडलीची झटपट बनणारी रेसिपी, या फोडणीने ती आणखी स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवा

Next Post
चालत्या गाडीला आग का लागते, असे झाल्यास कसा आपला जीव वाचवावा?

चालत्या गाडीला आग का लागते, असे झाल्यास कसा आपला जीव वाचवावा?

Related Posts
तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

Prakash Ambedkar: देशभरात सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेतृत्वाखाली विरोधकांची निवडणूक…
Read More
chagan bhujbal

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – छगन भुजबळ

मुंबई – केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही, आडनावावरून जात ओळखता येणार नसल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी…
Read More
"मला धर्मांध हिंदू नको, धर्माभिमानी हिंदू हवा", राज ठाकरे यांचे लक्षवेधी वक्तव्य

“मला धर्मांध हिंदू नको, धर्माभिमानी हिंदू हवा”, राज ठाकरे यांचे लक्षवेधी वक्तव्य

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा…
Read More