अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, झुंजार नेत्याने घेतला भाजपचा झेंडा हाती

Mumbai – भाजपने उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत अवधूत तटकरे(Avadhut Tatkare)  यांनी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अवधूत तटकरे यांनी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असं अवधूत तटकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, निर्णय घेण्याचं एकच कारण म्हणजे देशात असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व आणि राज्यात नव्याने आलेलं सरकार हे राज्याला प्रगतीपथावर नेत आहे. भाजपची रायगड जिल्ह्यात वाढ कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील. भाजपत प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. कोणत्याही पदाची मी अपेक्षा केली नाहीये मात्र, संघटनेत जी काही जबाबदारी देण्यात येईल ती मी पार पाडेल. असं ते म्हणाले.