Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Cervical Cancer) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. स्वत: पूनमने आपल्या मृत्यूचा बनावट दावा केला होता. आता याप्रकरणी सोशल मीडिया स्टार फैजान अन्सारीने पूनम पांडे आणि पती सॅम बॉम्बे यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने पूनम पांडेवर महिलावर्ग आणि तिच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
पूनम पांडेवर FIR नोंदवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. युपीमधील फीलखाना पोलिस स्टेशनच्या एसएचओला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक, पूनम पांडेने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने स्वतःचा मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. त्यामुळेच तिच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आल्याचं समजतंय.
#UPNews : कानपुर में पूनम पांडे और उनके पति सैम के खिलाफ मानहानि का केस, दोनों के खिलाफ 100 करोड़ की मानहानि का केस
FIR के लिए कानपुर पुलिस कमिश्नर को दी गई तहरीर, पूनम ने कैंसर से मौत को लेकर फैलाई थी झूठी अफवाह #Kanpur #PoonamPandey #PoonamPandeyDeath #KanpurPolice pic.twitter.com/559Sl2BBYG
— Sandesh Wahak (@sandeshwahakweb) February 11, 2024
दरम्यान फैजान अन्सारी हा तोच व्यक्ती आहे ज्याने काही काळापूर्वी उर्फी जावेदविरोधात मुंबईत एफआयआर दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या :
कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत
Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण
Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी