गंगाखेड (विनायक आंधळे) : अयोध्या (Ayodhya) येथे प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. देशभरात म्हणजे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत नागरिकांनी दिवाळी साजरी केली. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सारा देश राममय होऊन गेला. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान मंदिर नवा मोंढा, गंगाखेड (Gangakhed) येथे सामुहिक रामरक्षा पठण, महाआरती, भव्य दिपोत्सव व महाप्रसाद देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी, ॲड.मनोज काकाणी, रामेश्वरजी तापडीया, संजयआप्पा धुळे, ॲड.राजु देशमुख, राजु लांडगे, लक्ष्मीकांतसेठ रुद्रवार, प्रमोदआप्पा धुळे यांच्या हस्ते सपत्निक महाआरती करण्यात आली. बंडुशेठ घुले, आकाश भाऊसाहेब जामगे, विनोदआप्पा धुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. मंदिर स्वच्छता समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन
Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा
Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल