शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं : रोहित पवार

जालना- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मविआ सरकार (MVA ) स्थापनेत  महत्वाची भूमिका बजावली आहे. तीन पक्षांची जरी आघाडी असली तरी तरी यांचे सर्वेसर्वा हे शरद पवार आहेत यामुळेच सातत्याने विरोधकांकडून शरद पवार यांनाच लक्ष्य केले जात आहे.

गेल्या २ सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी (raj Thackeray) शरद पवार यांच्यावर थेट जाती-पातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर जातीय राजकारण करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) देखील आरोप केले होते. त्यांनी एकामागोमाग तब्बल १४ ट्विट करत पवारांवर टीकास्त्र सोडले होते.

१९९९ साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचा जन्म झाला त्यानंतर या महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण जन्माला आलं असं राज यांनी भर सभेत जाहीर करून टाकलं.राष्ट्रवादीच कशी जातीयवादी आहे आणि जातीचं राजकारण पवारांनी कस सुरू केलं याबाबत ठाणे येथील सभेत राज यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता.फडणवीसांनी देखील ट्विट करत पवारांना घेरलं होत शरद पवारांचं राजकारण कसं मुस्लिमांच्या अवतीभोवती आहे आणि राजकारणासाठी पवारांनी कशी प्रो मुस्लिम भूमिका घेतली यावरून १४ ट्विट करत फडणवीसांनी पवारांवर टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, एका बाजूला ही टीका होत असताना दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेला एक दावा चांगलाच चर्चेत आला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उदघाटनाच्या वेळी बोलताना त्यांनी हा दावा केलाय.

काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केले जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जात आहे.लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही.त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा यांना हाताशी धरले जात आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मविआच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत यावरून विरोधकांनी टीका करणे सुरू केले असले तरी आमदार रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाईन, असे रोहित यांनी म्हटले आहे.