राजधानी दिल्ली बनली गॅस चेंबर; शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी

Delhi Air Pollution दिल्लीतली हवेची पातळी सातत्यानं घसरत असल्यामुळं यासाठीच्या श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा चौथा टप्पा इथं लागू करण्यात आला आणि सर्व प्राथमिक शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. इथं हवेची सरासरी पातळी 454 इतकी होती, जी गंभीर या गटात मोडते.

या पार्श्वभूमीवर ही कृती योजना कार्यान्वित करण्यासाठीच्या उपसमितीची बैठक काल नवी दिल्लीत पार पडल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिली. इयत्ता सहावी ते अकरावीचे वर्गही प्रत्यक्ष उपस्थितीऐवजी ऑनलाइन पद्धतीनं घेण्याबाबतचा निर्णय राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि दिल्ली सरकार घेऊ शकतं, असं या उपसमितीच्या बैठकीत ठरवण्यात आलं. तसंच सार्वजनिक, महापालिका आणि खासगी कार्यलयांतल्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना देण्याचा निर्णयही संबंधित सरकारच्या हाती देण्यात आला.

केंद्र सरकारच्या कार्यालयांतल्या कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याची मुभा देण्यासंबंधीचा निर्णय केंद्राच्या हाती सोपवण्यात आला. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात लागू झालेल्या श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेअंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणारे, अत्यावश्यक सेवांसाठी काम करणारे, सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रक सोडता इतर ट्रकना दिल्लीत प्रवेश करता येणार नाही. दिल्लीच्या बाहेरची नोंदणी असलेल्या इलेक्ट्रिक, सीएनजी आणि बीएस-चार डिजेलच्या गाड्या वगळता हलक्या वाहनांनाही हा नियम लागू असेल. श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या पहिल्या तीन टप्प्यांमधल्या निर्बंधांसोबतच आता हे अतिरिक्त निर्बंध लागू होतील.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी