सातपुड्याच्या जंगलातील मध या पट्ट्याने अमेरिका – सिंगापूरमध्ये फेमस केलं

महाराष्ट्र मध्यतरी संपूर्ण जगात एका कारणसाठी खूप प्रसिद्ध झालं होतं, ते कारण म्हणजे शेतकरी आत्महत्या. शेतकरी आत्महत्या हा मुद्दा संपूर्ण जगात इतका गाजला होता की जगभरातून अनेक विद्यार्थी येऊन त्यांचा अभ्यास करत होते. सरकारने तर यासाठी खूप प्रयत्न केले पण अमरावती शहरातील भावेश वानखेडे या तरुणाने देखील हा विषय मनावर घेतला. आज त्यांच्या व्यवसायात महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील शेतकरी जोडले गेले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांनी एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यांची Tribe Grown ही कंपनी अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा एक नवीन किरण ठरली आहे.

भावेशची Tribe Grown ही कंपनी जंगली मध, गाईचे तूप आणि हळदी पावडर यासारखे नैसर्गिक पदार्थ परदेशात विकते. त्यांनी त्यांच्या या प्रकल्पाअंतर्गत 1200 हून अधिक शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पनाचे नवीन साधन उपलब्ध करून दिले आहे. 2017 साली भावेशने अवघ्या 20 हजारात हा व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा व्यवसाय 30 लाखांहून अधिक आहे. आधी शेतकरी यांमध्यमातून 2500 -3000 हजार मुश्किलीने कमावत आता मात्र 7000- 8000 हजार रुपये कमावतात. यामुळे त्यांची जीवनशैली देखील बदलली आहे.

29 वर्षीय भावेश म्हणतो माझे वडील मेडिकल रिप्रेजेंटेटिव होते. त्यांना शेतकऱ्यांप्रती एक वेगळी संवेदना होती. ट्राइब ग्रोनचा चेहरा जरी मी असलो तरी यामागील आइडिया मात्र त्यांची होती. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ते जंगलामध्ये फिरण्यासाठी जात. आदिवासी शेतकऱ्यांशी चर्चा करत. त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजावून घेत, त्यांना मदत करत. भावेश म्हणतो जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी यासर्व गोष्टीकडे फार कमर्शियल दृष्टीने पाहत असे पण माझ्या बाबांची विचार करण्याची पद्धती फार वेगळी होती. ते नेहमी म्हणायचे की समाज, संस्कृती आणि मानसिक विकास होतो तेव्हा आर्थिक विकास सहज होतो.

भावेश जेव्हा टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जेव्हा शिकत होता तेव्हा त्याने तेथे पाहिले ऑर्गनिक म्हणजेच नैसर्गिक रित्या उत्पादीत केलेल्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. जी गोष्ट आपण खेड्यात किंवा जंगली परिसरतात 10 रुपयांना विकत घेतो त्यांना शहरी बाजारात 150 रुपये इतकी किंमत मिळते. यातूनच मला एक नवीन कल्पना सुचली. 2015 -2017 या काळात भावेश त्यांच्या कॉलेजचा एक प्रकल्प करत होता, तेव्हा त्याने ट्राईब झोनची स्थापना केली. या दोन वर्षात त्याने आदिवासी समुदयांचा भरपुर अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आदिवासी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत, त्या अजून देखील उत्तम आहेत त्यावर कोणतेच केमिकल्स वापरले गेले नाहीत.

तेथे वायु प्रदूषण देखील नाही आणि ध्वनी प्रदूषण देखील झालेले नाही. त्यामुळे जे ,काही मिळेल ते सर्व उत्तमच आणि ओरीजनल असेल. भावेशने आदिवासी शेतकऱ्यांना समजावून सांगितले त्यांच्या कडून मध विकत घेण्यास सुरुवात केली. मध काढण्याच्या योग्य पद्धती शिकवल्या. जे शेतकरी तयार नव्हते त्यांना तयार केले. ज्या शेतकऱ्यांना सुधारणा केल्या नाहीत त्यांच्या सोबत कडक वागून बदल करून घेतले. शेतकऱ्यांच्या देखील एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपण स्वता मध काढून जर ते रस्त्यावर विकले तर आपल्याला 100 रुपये मिळतात पण तेच आपण Tribe Grown सोबत विकते तर आपल्याला नक्कीच यातून उत्तम फायदा मिळतो.

कारण Tribe Grown तब्बल 300 रुपये इतके पैसे देते होते. त्यामुळे आदिवासी शेतकरी आमच्या सुचनाचे पालन करू लागले. आधी शेतकरी मध काढण्यासाठी संपूर्ण पोळ जाळत असे पण आम्ही त्यांना मध काढण्याची योग्य पद्धती शिकवली. आधी त्यांना 3 -4 किलो इतके मध मिळत पण आता ते 7-8 किलो मदत काढतात. मधा सोबत इतर उत्पादन जसे की तूप आणि इतर यांना देखील उत्तम मागणी आहे. आता भारतासह अमेरिका आणि इतर देशांत देखील या मधाची मागणी केली जात आहे.