महाविकास आघाडी अडीच वर्षांपासून सत्तेत असल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही – चाकणकर

मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात असतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर (Tweet) सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी (MVA)अडीच वर्षांपासून सत्तेत असल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही. राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था बिघडवण्याचे काम केले जात आहे.  गेल्या तीन दिवसांपासून राणा दाम्पत्यांनी मुंबईत जो गोंधळ घातला हे मनोविकृतीचे (Psychosis) एक उदाहरण आहे, असा  टोला  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार नवनीत राणा  यांना लगावला.
राज्यात कायदा सुवव्यस्था (Law And Order) कोण बिघडवत आहे, आंदोलनासाठी रस्त्यावर बसणे, आम्ही हे करू ते करू, हे कोण सांगत आहे. यासाठी पोलिसांना कायदा सुव्यवस्था वापरावी लागेल. त्यामुळे विकृत मनोवृत्ती समाजामध्ये वाढायला लागली आहे. त्याचे हे उदाहरण आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी राणा दाम्पत्यावर केली.