मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण

Nawab Malik, Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), ज्यांना लाँड्रिंग प्रकरणात 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत (Mahayuti) घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर सध्या राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी कित्येक वर्षापासून राहिले आहेत. त्यांच्यावर मध्ये काही आरोप झाले, त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत घडामोडी झाल्या. त्यावेळी नवाब मलिक कोणाबरोबरही नव्हते. मेडिकल ग्राउंडवर त्यांना जामीन मिळाल्यानंतर आम्ही सगळेच त्यांना भेटायला गेलो. बाकीचे लोकही गेले. सहकाऱ्यांच्या तब्येतीबाबत माहिती घेणं हे आमचं कर्तव्य होतं असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिक हे आमदार आहेत आणि ते विधानसभेत आल्यानंतर जुने सहकारी त्यांना भेटले ते स्वभाविक आहे. आम्ही कुठेही नवाब मलिकांची भुमिका काय? त्यांची उद्याची वाटचाल काय? याबद्दल कुठलीही चर्चा केली नाही. ते मेडिकल बेलवर असल्याने या विषयावर त्यांच्याशी अजिबात चर्चा करायची नाही.

ते (नवाब मलिक) विधानभवनात कुठे बसले हे महत्वाचं नाहीये. त्यांच्याकडे अधिकार आहे म्हणून ते आले. आता आल्यावर कोणाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कृत करतो किंवा दुसरे त्यांना पुरस्कृत करतात म्हणणं ही दिशाभूल करणारी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहीलं त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे आहेत की दुसरीकडे आहेत, हा प्रश्नच निर्माण केला नाहीये. हा प्रश्न पुढचा आहे, पुढे काही होईल तेव्हा उत्तर देऊ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम