केलेली लूटमार उघडकीस येणार म्हणल्यावर बुडाला आग लागणं साहजिकच आहे; सतपुतेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आज एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या पोल खोल रथाची तोडफोड केली असल्याचा  प्रकार समोर आला आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी आज भाजपने आज एका सभेचं आयोजन केलं आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. मात्र तत्पूर्वीच भाजपच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलखोल होऊ लागल्याने आता सेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम सातपुते यांनी सेनेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या गुंडांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा बाजार उघड करणाऱ्या पोल खोल अभियानाच प्रदर्शन करणाऱ्या LED व्हॅनची तोडफोड केली. पेंग्विन आणि गटार उपसायच्या नावावर केलेली लूटमार उघडकीस येणार म्हणल्यावर बुडाला आग लागण साहजिकच आहे. असं सातपुते यांनी म्हटले आहे.