वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून त्यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर… – आठवले

मुंबई : समीर वानखेडे हे नार्कोटिकस कंट्रोल ब्युरो या सेलचे प्रमुख अधिकारी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी समीर वानखडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून समीर वानखडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महा विकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे. असा घणाघात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

अशा प्रकाराचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे. त्या निर्णयासाठी फक्त समीर वानखडे या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे. नवाब मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई हा समीर वानखेडे यांच्या कर्तव्याचा भाग होता .

नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

हे देखील पहा