Parth Pawar | लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सज्ज राहा; पार्थ पवार यांची डरकाळी

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराकडून पुणे येथील जिजाई निवासस्थानी पार्थ पवार यांचं प्रतिमा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शहर सचिव अमोल जगताप शहर संघटक हुलगप्पा शासम, शहर संघटक ऋषी येवले, पवन बेरे आदींच्या उपस्थितीत सत्कार करून युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या बळकटीसाठी संघटनात्मक बांधणी करा सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा युवा नेते पार्थ पवार यांनी केलं. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापुरातील विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात पार्थ पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच सोलापूर शहराच्या विकासासाठी अजित पवारांनी भरघोष निधी उपलब्ध करून दिला या कार्याचा अहवाल देखील किसन जाधव यांनी पार्थ पवार यांना दाखविला यावेळी जातीने लक्ष घालून पाहिला.

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विशेष लक्ष आहे. सोलापूर शहराच्या विकासासाठी पवार साहेब हे नेहमी अग्रेसर असतात सोलापूर शहर आणि जिल्हा हे विकासापासून वंचित राहू नये यासाठी विकासाच्या दृष्टीने जो काही निधी असेल ते उपलब्ध करून देतील अशी ग्वाही देखील यावेळी पार्थ पवार यांनी किसन जाधवांना दिली. नुकतंच पार्थ पवार यांचं वाढदिवस झाला त्यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?