Taapsee Pannu Wedding | तापसी पन्नूने प्रियकराशी गुपचूप केले लग्न? उदयपूरमध्ये पार पडले लग्नाचे विधी

Taapsee Pannu Wedding | चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा दीर्घकाळाचा प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत गुपचूप लग्न केले आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोसोबत लग्न केले. तापसी आणि मॅथियास खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या (Taapsee Pannu Wedding) बातम्या येत होत्या, मात्र तापसीने याला दुजोरा दिला नाही.

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की त्यांच्या लग्नात फार कमी आणि अगदी जवळचे पाहुणे उपस्थित होते. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये पावेल गुलाटी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचाही समावेश होता.

काही काळापूर्वी दोघांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार होणार असल्याची बातमी आली होती. दोघांच्या लग्नाचे विधी 20 मार्चला सुरू झाले आणि 23 मार्चला लग्नासोबतच संपले. त्याचा जवळचा मित्र पावेल गुलाटीने दोन दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा फोटो शेअर केला होता. फोटोत सर्व मित्र लग्नातील वस्त्र परिधान केलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, “आम्ही कुठे आहोत याची आम्हाला कल्पना नाही.”

तापसी पन्नूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या लेखिका कनिका ढिल्लनने काल काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटोही तापसीच्या लग्नसोहळ्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. कनिका आणि तापसीने हसीन दिलरुबा, मनमर्जियां, डंकी आणि फिर आयी हसीन दिलरुबा यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, या मित्रांनीही लग्नाबद्दल एक शब्दही लिहिला नाही.

तापसी पन्नू आणि मथियास बर्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही रिलेशनशिपवर काहीही सांगितले नसले तरी. दोघांची पहिली भेट 2013 मध्ये झाली होती. मॅथियास हा डॅनिश बॅडमिंटनपटू असून त्याने 2015च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार